श्रद्धेची बेडी तोडावी
माणसाने बुद्धिप्रामाण्यवादी असावे. सत्य काय, असत्य काय ते स्वबुद्धीने विचार करून जाणावे. सत्याचा स्वीकार करावा. असत्याचा त्याग करावा. हे कोणत्याही बुद्धिप्रामाण्यवादी संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असते. जगन्निर्माता, जगन्नियंता, पूजा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धावून येणारा देव आहे असे बहुसंख्य आस्तिक माणसे मानतात. खरेतर असा देव अस्तित्वात नाही हे सहज समजते. कारण वर वर्णन …